अनगरच्या पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

अनगरच्या पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा

 अनगरच्या पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा




अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अनगर येथे जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महादेव चोपडे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सत्यवान कांबळे यांनी मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विशद केले. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हाने, उपलब्ध संसाधनांवरील ताण तसेच लोकसंख्येचे योग्य नियोजन व कौशल्यपूर्ण वापर केल्यास भारत महासत्ता बनू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, कला विभागप्रमुख रमेश चव्हाण, विज्ञान विभागप्रमुख गोरख गायकवाड, दाजी गुंड, सत्यवान दाढे, सोमनाथ ढोले, डॉ. प्रशांत कुलकर्णी,बापुराव घुले, गणेश उघडे,आनंद आदलिंगे, झाकीर मुलानी, परमेश्वर कुंभार, क्षमा काझी, अर्चना गुंड तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर दाजी गुंड यांनी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages