आर्यारवी एंटरटेनमेंट'चा प्रथम राज्यस्तरीय पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक पुरस्कार सोहळा दादरमध्ये उत्साहात संपन्न! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

आर्यारवी एंटरटेनमेंट'चा प्रथम राज्यस्तरीय पत्रकार, साहित्यिक व समाजसेवक पुरस्कार सोहळा दादरमध्ये उत्साहात संपन्न!

 आर्यारवी एंटरटेनमेंट'चा प्रथम राज्यस्तरीय पत्रकारसाहित्यिक व समाजसेवक पुरस्कार सोहळा दादरमध्ये उत्साहात संपन्न!

श्री. रघुनाथराव ढोक मानाच्या पुरस्काराने गौरविले




मुंबई (कटूसत्य वृत्त):-  आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित "१ ला पत्रकारमुक्त पत्रकारसंपादककलासाहित्यसमाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६" दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये रविवारी (दि. १२ जुलै) अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. कलासाहित्यपत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध दिग्गजांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सद्श्य व फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे  अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथराव ढोक यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “जनसेवा रक्षक पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार व जादूगार सन्मा. श्री. श्रीधर कीर, "कुटुंब रंगलंय काव्यात" फेम सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापटप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री. अरुण म्हात्रे, 'दर्याचा राजा'चे संपादक साहित्याचार्य श्री. पंढरीनाथ तामोरेआणि जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री. गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर उपस्थित होते.

तसेच शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल भार्गवराम शिर्के, 'सी आय बीसंघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. वैभव सुरेश कदमशुश्रूषा हॉस्पिटलचे माजी कोषाध्यक्ष व संचालक श्री. कृष्णा बाळू काजरोळकरप्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक अ‍ॅड. गौरव जयवंत पाटील आणि 'स्पेस रिअलटर्स'चे श्री. अतुल तोडकरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करतसमाज घडवण्यामध्ये लेखणी आणि सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या सन्मानार्थी मध्ये विलास खरातविजय टाकणेमिर्झा गालिब ,राहुल खरात, सचिन वाघमारेसुधीर पाटीलदादासो वाकसेसदाशिव पुकळेराजू शेखअनुश्री खांडेकरयोगिता कोठेकरडॉ. दीपक खरातजावेद शेखफिरोज शेख सोबत अनेक महाराष्ट्रातील पत्रकारउपस्थितीत बांधवाचा निर्भीड जागरूक पत्रकारिता बद्दल देखील सन्मान केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि संयोजन पाहता उपस्थितांनी आयोजक आर्यारवी एंटरटेनमेंटचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे नेटके आयोजन आर्यारवी एंटरटेनमेंटचे प्रमुखप्रसिद्ध लेखकअभिनेतादिग्दर्शक आणि पत्रकार श्री. महेश्वर तेटांबे यांनी केले होते.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages