राजेंद्र गुंड यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातही नावलौकिक- चेअरमन अनभुले
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा आदर्श पत्रकार राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केले आहे.त्यांच्या अभ्यासू, परखड,निर्भिड,वाचनीय व वस्तुनिष्ठ लेखणीमुळे अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत.आज पत्रकारितेच्या क्षेत्रात भयंकर स्पर्धा व चढाओढ आहे तरीही त्यांनी स्वकर्तृत्वाने पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळा ठसा आणि नावलौकिक कमावल्याचे गौरवोद्वार डीसीसी बँकेचे शाखाधिकारी तथा पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले यांनी काढले आहेत.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांना दैनिक पुण्यनगरी समूहाचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था,सनराईज मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.
यावेळी लेखापरीक्षक सुहास शिंगाडे म्हणाले की,पत्रकार राजेंद्र गुंड यांनी मानेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांना वेळोवेळी लेखनीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.या भागातील विविध रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने लेखनीतून प्रयत्न केला आहे.या भागातील सर्व प्रकारच्या बातम्यांना स्थान देण्याची त्यांची भूमिका असते.त्यांनी मागील 10 वर्षांपासून मानेगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव, स्थानिक पुढारी,कार्यकर्ते व विविध चळवळीत काम करणाऱ्या लोकांना पेपरमध्ये संधी दिली आहे.त्यांनी लेखणीतून मांडलेले अनेक सामाजिक विषय वाचकांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र गुंड यांनी सांगितले की, माझ्या यशात माझे वडील सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे.मानेगाव गटासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व नोकरदार,राजकीय नेते, शिक्षक व शेतकरी यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. अनेकांच्या उत्कृष्ट व विशेष उल्लेखनीय कार्यामुळे मला लेखणीच्या माध्यमातून विविध विषय व प्रश्न प्राधान्याने मांडता आले. यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री स्वामी समर्थ पतसंस्थेत सत्काराच्या वेळी चेअरमन अनिलकुमार अनभुले, व्हा.चेअरमन अनिलकुमार बरकडे,मुख्याध्यापक सौदागर गव्हाणे,पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे,सतीश गुंड,भिमराव नागटिळक, दिनकर कदम, युवराज शेगर,नेताजी खैरे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सनराईज मित्रपरिवाराच्या सत्काराच्या वेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,शांताबाई गुंड,मेघना गुंड, मेघश्री गुंड,राजाभाऊ कदम, मुख्याध्यापक सौदागर गव्हाणे,नेताजी उबाळे, ग्रामसेवक सुधाकर गव्हाणे, सतीश गुंड,कैलास सस्ते, भिवाजी जाधव,समाधान कोकाटे,ब्रम्हदेव शिंगाडे, कांतीलाल शेंडगे,महादेव बरकडे उपस्थित होते.
समस्त खरात परिवार व मित्रमंडळींच्या वतीने सत्कार करताना सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी प्रताप खरात, लताबाई खरात,राणी खरात,जलसंपदा विभागाचे सौदागर खरात,राजाभाऊ कदम,सुनील शेंडगे,ब्रम्हदेव शिंगाडे,गोरखनाथ शेगर, सज्जन मुळे,सतीश गुंड, कांतीलाल शेंडगे,भिवाजी जाधव,ब्रम्हदेव खैरे,बाळू यादव उपस्थित होते.
समस्त भांगे परिवार व मित्रमंडळींच्या वतीने सत्कार करताना सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सदाशिव कदम, लेखापरीक्षक सुहास शिंगाडे, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,आदर्श मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे, पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे, मोहन भांगे,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे मारुती शेंडगे, समाधान कोकाटे,सुजाता भांगे,सुवर्णा भांगे,शांताताई भांगे,मेघना गुंड,उषाताई गव्हाणे,प्रा.रोहित भांगे,महेश भांगे,सक्षम भांगे,सौदागर खरात,गोरखनाथ शेगर, बबनरावजी शिंदे शुगरचे तानाजी मोटे,राहुल खांडेकर यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment