सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या युवा चित्रकार कांचन गोडाळे यांच्या ‘चित्रांकन’ या भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन मंगळवार, दि. २८ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डफरीन चौक येथील पू. ना. गाडगीळ अँड सन्स येथे करण्यात आले आहे. विविध कलाशैलींचा संगम असलेल्या या प्रदर्शनात मंडला आर्टसह आध्यात्मिक, पारंपरिक आणि आकर्षक चित्रकृतींचा अनोखा संग्रह कला रसिकांना पाहायला मिळणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध हास्यसम्राट व चित्रकार दीपक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड हे असतील.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार डॉ. पद्मा देशपांडे, पू. ना. गाडगीळ अँड सन्स चे हेड सेल्स जितेंद्र जोशी तसेच डॉ. लता गोडाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रदर्शनामध्ये मंडला आर्टबरोबरच भारतीय संस्कृती, अध्यात्म, पारंपरिक विषय तसेच विविध भावविश्व उलगडणाऱ्या आकर्षक चित्रकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नवोदित कलाकारांसाठी हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे प्रदर्शन दि. २८ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते रात्री ८.३० या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कला रसिक, विद्यार्थी, नागरिक तसेच चित्रकलेची आवड असलेल्या सर्वांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन युवा चित्रकार कांचन गोडाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages