आषाढीवारी निमित्त महाराष्ट्र बँकेकडून वारकरी व पोलिसांना साहित्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

आषाढीवारी निमित्त महाराष्ट्र बँकेकडून वारकरी व पोलिसांना साहित्य वाटप

आषाढीवारी निमित्त महाराष्ट्र बँकेकडून वारकरी व पोलिसांना साहित्य वाटप



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवार दिनांक १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन व नातेपुते येथे मुक्काम असल्याने अनेक भाविक वारकरी नातेपुते नगरीत दाखल झाले होते. यावेळी
नातेपुते येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने पालखी सोहळा आगमनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण बँकेच्या वतीने सेवाभावी सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी नातेपुते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना अखंड हरिपाठ पुस्तिकांचे व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच पालखी सोहळा वारीच्या काळात पोलीस प्रशासनाती
ल पोलीस व अधिकारी अहोरात्र रस्त्यावर उतरूनhp nj  ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता पालखी सोहळ्यात वारकरी बांधवांना व नागरिकांना सुरक्षेची सेवा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना पावसापासून संरक्षणासाठी उत्कृष्ट दर्ज्याचे रेनकोट महाराष्ट्र बँकेकडून वाटप करण्यात आले.या घेण्यात आलेल्या उपक्रमाला वारकरी, नागरिक व पोलीस प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात सहभागी होत वारकरी भाविकांची सेवा करण्याची दरवर्षी संधी मिळणे ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी गौरवाची बाब असल्याची भावना यावेळी  बँक व्यवस्थापनाने व्यक्त केली. या घेण्यात आलेल्या पालखी सोहळ्यातील सेवाभावी उपक्रम व सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल वारकरी समुदाय, पोलीस प्रशासनाने तसेच समाजातील नागरिकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे समाधान व्यक्त करून बँक प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages