अकलूजच्या विकासासाठी 539 कोटीचा निधी मंजूर - उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

अकलूजच्या विकासासाठी 539 कोटीचा निधी मंजूर - उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह

अकलूजच्या विकासासाठी 539 कोटीचा निधी मंजूर - उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह





अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज मधील वेगवेगळ्या भागातील विकास कामांसाठी शासनाकडून एकूण 539 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती, अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     यावेळी त्यांनी अंडरग्राऊंड गटर (निधी- 121 कोटी) यामध्ये 130 कि. मी. मंजूर काम,  त्यापैंकी 70 कि. मी काम पूर्ण, मेन चेंबर 5,000 त्यापैकी 3,300 पूर्ण, साईड चेंबर 7,000 त्यापैंकी 3,600 पूर्ण,  4.50 लाख MLD मलजल शुध्दीकरण केंद्र काम मंजूर असून ते काम अकलाईदेवी मंदीर जवळ सुरू करण्यात येणार आहे. 12 लाख MLD मंजूर करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तर रस्ते (निधी 120 कोटी)
यामध्ये 18 कि.मी. रस्ते आणि 36 कि. मी. गटर मंजूर, त्यापैकी 5 कि. मी रस्त्याचे काम चालू आहे व 10 कि. मी. गटरीचे काम चालू आहे.
तर पाणीपुरवठा (निधी- 212 कोटी)
 एकूण पाणीपुरवठा लाईन 150 कि. मी. त्यापैकी 90 कि.मी. काम पूर्ण, 77 मैल ते विझोरी तळे 9 कि. मी. ही स्वतंत्र पाईप लाईन, त्यामुळे आपण 12 महिने पाणी तळ्यात आणू शकतो. तसेच तेथे एक जाकवेल व सोलार सिस्टीम देखील आहे. जुना Balancing Tank क्षमता 230 MLD होती, नविन क्षमता 680 MLD होणार.
पूर्ण Balancing Tank RCC होणार. तसेच नविन 5 पाणीपुरवठा टाकी शिवकिर्तीनगर, पंचवटी, विद्यानगर, गुळवेनगर, राऊतनगर, शिवकिर्तीनगर व पंचवटी काम पूर्ण, विद्यानगर व राऊतनगर काम सुरू आहे.गुळवेनगर येथील काम सुरू होणार आहे. जुने Filter House 6 MLD व 8 MLD Capacity चे होते, नविन Filter House 12 MLD Capacity चे करण्यात आले आहेत. सर्व विभागात समान व प्रेशर ने पाणीपुरवठा होण्यासाठी विझोरी तळे येथे 8.50 लाख लिटर Master Balancing नविन पाणी टाकी तयार करण्यात आली आहे.
    पुढे बोलताना शिवतेसिंह मोहिते पाटील म्हणाले, माळेवाडी येथील शिवाजीनगर पटेल कॉलनी शांतीनगर येथे सुमारे आठशे कुटुंब राहतात, त्यांना ग्रामपंचायत स्थापनेपासून (1985) बोरवेलचे पाणी होते, यांना आठ ते दहा दिवसात वॉटर सप्लायचे पाणी मिळणार आहे.तसेच पुढील काही दिवसात सर्व माळेवाडी येथील उर्वरित भागात वॉटर  सप्लायचे पाणी देण्यात येणार आहे. त्याचेही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर सार्वजनिक बांधकाम विभाग (सीआरएफ) निधी 17 कोटी, यामध्ये बायपास रोड जयसिंह चौक ते महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक, अंडर ग्राउंड स्टॉम वॉटर 4 कि.मी.
अंडर ग्राउंड युटिलिटी 4 कि. मी.
दोन्ही बाजूंना दोन मीटरने वायडिंग, दोन्ही बाजूंना 2.5 मीटरने फूटपाथ लाईट , बसण्यासाठी बाकडे, डिव्हायडर व त्यामधील झाडे,
चौक सुशोभीकरण निधी 2.50 कोटी, महर्षी चौक जयसिंह चौक आणि प्रतापसिंह चौक महर्षी चौक येथे डेकोरेटिव्ह फोन उभारण्यासाठी निधी 70 लाख, पालखी निधी 80 लाख, मुरमासाठी 45 लाख खड्डे बुजवणे 10 लाख लाईट साठी 15 लाख आरोग्य 10 लाख, विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे नमो उद्यान अंतर्गत निधी 1 कोटी, यामध्ये लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, walking Track ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, लहान मुलांसाठी खेळणी, योगा हॉल ओपन जिम, झाडे लोन डेकोरेटिव्ह लाईट, अशी कामे करण्यात येणार असून, अंडरग्राउंड गटर निधी 121 कोटी, रस्ते निधी 120 कोटी, पाणीपुरवठा निधी 212 कोटी जिल्हा नियोजन निधी 64 कोटी सीआरएफ बायपास रस्ता सुशोभीकरण निधी 17 कोटी, चौक सुशोभीकरण 2.50 कोटी,
नमो उद्यान निधी 1 कोटी, पालखी अनुदान 80 लाख,  डेकोरेटिव पोल 70 लाख असा एकूण निधी 539 कोटी मंजूर झाला असल्याचे अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील म्हणाले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages