आरोग्य विज्ञान विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी केला एकत्रितरित्या सांस्कृतिक कार्यक्रम
नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात मा. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे (अतिरिक्त कार्यभार), यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पंदन २०२६ मधील विजेते विद्यार्थीसंघ व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता विद्यापीठातर्फे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. श्रृंखला कौशिक, श्री. संजय मराठे, श्री. संदीप राठोड, श्रीमती अमृता खार्डेकर, श्री. रविंद्र रांधव, श्री. नाना परभणे, श्रीमती चेतना पवार, श्री. उल्हास कुलकर्णी यांनी विविध हिंदी व मराठी गीते सादर केली.
विद्यापीठाचा यंदाच्या वर्षातील स्पंदन राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धेतील निवडक विजेते यांनी कलाप्रकार सादर केले. यामध्ये सोलापूर येथील साई आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वॉय नॉट ही एकांकिका सादर केली. मुंबई येथील आय.एन.एच.एस. अश्विनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य समूहगान सादर केले. मुंबई येथील सुनंदा प्रविण गंभीरचंद्र परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोक संगित सादर केले. पालघर येथील रिध्दी विनायक परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवली लोक नृत्य सादर केले. कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लावणी लोक नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच प्रास्ताविक डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनामिमित्त सहभोजन आाणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झला.

.jpeg)
No comments:
Post a Comment