जकराया प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी अशपाक बागवान यांची नियुक्ती
अंकोली(कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील मौजे येणकी येथील जकराया प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी अशपाक अ.गणी बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे सचिव तथा विद्यमान मुख्याध्यापक बी.पी. पाटील हे बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत.त्यांच्या जागी बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाणारे बागवान हे मागील बत्तीस वर्षांपासून प्रशालेत हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत.यावेळी संस्थेच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. पी.पाटील, सेवानिवृत्त शिक्षक अशोक शेटे,शालेय समितीचे नूतन अध्यक्ष जगन्नाथ जाधव व नूतन मुख्याध्यापक अशपाक बागवान यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष डी.पी. पाटील,सचिव बी.पी. पाटील, संचालक नागनाथ पाटील, शिक्षक, कर्मचारी व पालकांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:
Post a Comment