पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार आषाढी वारी पूर्वी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार आषाढी वारी पूर्वी

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार आषाढी वारी पूर्वी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन



                                          - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

 

       पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आज मंदिरात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत निरीक्षण करण्यात आले. आषाढी यात्रेपूर्वी मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणराज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.

        बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरमंदिर समिती सदस्यसल्लागार परिषद सदस्यस्थानिक महाराज मंडळीभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारीमूर्ती संवर्धन तज्ज्ञ तसेच पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

 

         जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले कीभारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भाविकांना पददर्शन घेता येते. मूर्ती दीर्घकाळ टिकावी यासाठी तिचे जतन व संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. वज्रलेप करण्याबाबत तज्ज्ञांनी आपली मते मांडली असून कोणती पद्धत वापरायची याबाबत पुरातत्त्व विभागाचा सल्ला घेऊन दोन ते तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल.दररोजच्या नित्योपचारात दहीदूधमध यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याने मूर्तीच्या आतील बाजूस काही नुकसान झाले आहे कायाची तपासणी करण्यासाठी लायडार स्कॅन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र स्कॅनिंगमुळे मूर्तीला हानी होऊ शकते कायाचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल. यासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

          सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले कीश्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून वारकरी भाविकांचा श्वास आहे. मूर्तीचे जतन व संवर्धन मंदिर समितीमार्फत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. वज्रलेप करण्यास समितीचा विरोध नाहीमात्र सर्व महाराज मंडळी व तज्ज्ञांच्या सामोपचाराने निर्णय घेतला जाईल.

 

          कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले कीमूर्ती जतन आणि संवर्धनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणछत्रपती संभाजीनगर तसेच राज्य पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सल्लामसलत करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल.

 

          बैठकीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तज्ज्ञ एस. सुब्रमण्यमभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगरचे उपअधीक्षक डॉ. विनोद कुमारसेवानिवृत्त अधिकारी विलास मंगीराजसहाय्यक संचालक डॉ. विलास वाहनेआशीर्वाद ऐरानीविकास सावंत व महेशाचार्य उत्पात यांनी मूर्ती संवर्धनासंदर्भातील तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

 

          श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती प्राचीन असून पूर्वीपासून नैसर्गिक पद्धतीने वज्रलेपन करण्यात येत होते. हीच पद्धत पुढेही वापरावीअशी सूचना वीर महाराज यांच्या सह अन्य महाराज मंडळींनी बैठकीत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages