पर्यावरण दिनानिमित्त मुख्य डाकघर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 11, 2026

पर्यावरण दिनानिमित्त मुख्य डाकघर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

 पर्यावरण दिनानिमित्त मुख्य डाकघर येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर विभाग आणि मुख्य डाकघर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोलापूर मुख्य डाकघर परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियानाने करण्यात आली. यावेळी सोलापूर शहराच्या उपमहापौर तथा पर्यावरण रक्षक सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डॉ. मनोज देवकर, संस्थापक – इको नेचर क्लब, आणि सौ. वर्षा खडकेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते .

यावेळी प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी तसेच गार्डनर श्रीमती रमा गायगवळी यांचा नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे व अतिथींनी पोस्ट ऑफिसला २० विविध जातींच्या देशी वृक्षांची भेट दिली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच डाक कर्मचाऱ्यांनी पोस्ट ऑफिस परिसरात आणखी १५ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी मुख्य डाकघर परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची, त्याच्या योग्य निगेची व परिसरातील स्वच्छता अभियानाची प्रशंसा केली. तसेच मुख्य डाकघराच्या हेरिटेज इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कर्मचारी व ग्राहकांच्या सुविधांसाठी ओपन जिम तसेच महिला कर्मचारी व ग्राहकांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मनोगत व्यक्त करताना सौ. हर्षरेखा शाईवाले यांनी मुख्य डाकघरात झालेल्या विविध सुधारणा, स्वच्छता व कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात हेमंत खडकेकर यांनी कर्मचारी कल्याणासाठी सुधारित मनोरंजन कक्ष, प्रशिक्षण केंद्र, स्वच्छ कार्यालयीन परिसर आणि निसर्गरम्य वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास सोमनाथ काळे (वरिष्ठ डाकपाल, सोलापूर मुख्य डाकघर), प्रफुल्ल बंगाले (सहाय्यक अधीक्षक), संदीप घोडके (सहाय्यक अधीक्षक), राहुल शित्रे (तक्रार निवारण अधिकारी), श्रीरंग रेगोटी लेखापाल तसेच सोलापूर डाक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जे. आर. नरुटे यांनी केले. चहा-बिस्किटांसह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages