योग करा, निरोगी रहा व आनंदी रहा- आ. सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ए-वन चौक येथील विठ्ठल मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. "शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते ॥""अशा या मंगलमय दीपप्रज्वलनाने आजच्या योग कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी अक्कलकोट नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ऋतुराज (बंटी) राठोड, नगरसेवक रमेश कापसे, अशोक जाधव, उर्मिला शिंदे, नगरसेविका अपर्णा सिद्धे, मल्लिकार्जुन मसुती, प्रदीप पाटील, दिनेश पटेल, अंदप्पा कळके, योगशिक्षक कस्तुरीताई गुरव, परमेश्वर जकापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर २०१५ पासून जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो, एकाग्रता सुधारते आणि जीवन अधिक निरोगी व आनंदी बनते. आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
कार्यक्रमात योगशिक्षक परमेश्वर गुरव व माणिक माशाळे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योगाचे धडे दिले. यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, राजशेखर उंबरणीकर, विजयकुमार पाटील, विलास कोरे, मल्लिकार्जुन आळगी, गुरुपादप्पाआळगी, दयानंद बिडवे, शिवशरण जोजन, राजू हिप्परगी, संजय हारकुड, डॉ. सतीश बिराजदार, वेद मूर्ती बसवराज शास्त्री तीर्थ, गजानन पाटील, डॉ. बसवराज नंदीकोले, राजशेखर हिप्परगी,सत्यजीत लोके, शिवशरण जोजन,मल्लिनाथ मजगे, मलकप्पा भरमशेट्टी, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश आवटे, विश्वनाथ नवभागे तसेच मोठ्या संख्येने योगप्रेमी व विवेकानंद प्रतिष्ठान व योग समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ देवरमनी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत दसले यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment