नियमित योगामुळे‎ निरोगी, सुदृढ व‎ तणावमुक्त‎ जीवन‎ शक्य –‎ किसन‎ जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

नियमित योगामुळे‎ निरोगी, सुदृढ व‎ तणावमुक्त‎ जीवन‎ शक्य –‎ किसन‎ जाधव

 नियमित योगामुळे‎ निरोगी, सुदृढ व‎ तणावमुक्त‎ जीवन‎ शक्य –‎ किसन‎ जाधव




सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-‎ २१ जून जागतिक योग दिनानिमित्त श्री‎ सिद्धेश्वर वनविहार‎ येथे‎ योगशिक्षक‎ चंद्रकांत‎ (ब्रदर)‎ जाधव व सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली‎ योग दिन‎ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.‎ पहाटेच्या‎ प्रसन्न‎ वातावरणात उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम‎ व ध्यानसाधना करून योगाचे महत्त्व‎ प्रत्यक्ष‎ अनुभवले. यावेळी सोलापूर महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक २२ चे‎ भाजपा नगरसेवक‎ किसन जाधव,‎ एमआयडीसी पोलीसचे पोलीस‎ निरीक्षक‎ विजयकुमार खोमणे,‎ पोलीस निरीक्षक‎ दत्ता‎ जाधव, पोलीस‎ हवालदार दत्ता उर्फ‎ अक्षय‎ जाधव, वरिष्ठ‎ सांख्यिक अधिकारी‎ अशोक कुमार,‎ दिलीप‎ कुमार, विविध‎ विभागांचे कर्मचारी‎ तसेच‎ शिक्षक सुहास सर यांच्यासह अनेक नागरिक‎ मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ मनोगत व्यक्त‎ करताना‎ सांगितले‎ की,‎ योग ही केवळ‎ व्यायाम पद्धती नसून‎ भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.‎ आजच्या‎ धकाधकीच्या‎ जीवनात‎ शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक‎ शांतता‎ आणि‎ सकारात्मक विचारांसाठी‎ योग अत्यंत आवश्यक आहे. नियमित‎ योगाभ्यासामुळे अनेक आजारांपासून‎ संरक्षण मिळते‎ तसेच व्यक्तिमत्त्व‎ विकासालाही चालना‎ मिळते.‎ प्रत्येक‎ नागरिकाने दररोज काही‎ वेळ योगासाठी‎ देऊन‎ निरोगी‎ जीवनशैली अंगीकारावी जागतिक‎ स्तरावर‎ योगाचा प्रसार‎ व्हावा‎ यासाठी‎ भारताने‎ महत्त्वपूर्ण‎ भूमिका बजावली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही योग‎ दिनानिमित्त आयोजित‎ कार्यक्रमात‎ सहभाग‎ नोंदवला. त्यांच्या आवाहनानुसार देशभरात विविध‎ ठिकाणी भल्या‎ पहाटे योग‎ दिन उत्साहात‎ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या‎ शेवटी‎ उपस्थितांनी नियमित‎ योग‎ करण्याचा संकल्प‎ केला. योगाच्या‎ माध्यमातून‎ निरोगी‎ भारत व‎ सशक्त‎ समाज निर्माण‎ करण्याचा‎ संदेश‎ यावेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages