कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- मन, मेंदू आणि मनगट सुदृढ ठेवण्यासाठी योगाची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग विद्या आत्मसात करून ध्यानधारणा केल्यास, एकाग्रता वाढून त्यांची शैक्षणिक प्रगती होते आणि शरीर निरोगी बनते असे मत मल्लिकार्जुन मसुती यांनी व्यक्त केले.

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात रविवार दि 21 जुन रोजी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग शिबिरात विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, जूनियर विभाग प्रमुख पूनम कोकळगी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, प्राचीन काळापासून भारतात योगाचा अभ्यास सुरू आहे. चांगल्या आरोग्यासाठी सध्या योग आणि प्राणायाम करण्याची गरज आहे. योग साधनेमुळे शरीर सुदृढ होते म्हणून विद्यार्थ्यांनी देखील दररोज योगाचा अभ्यास  केला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज सर्वजण मोबाईल, लॅपटॉप यांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे व्यायामाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी योग विद्येची आराधना केली पाहिजे.

यावेळी योग व प्राणायामचे प्रशिक्षण व माहिती योगशिक्षक चंद्रकांत बिराजदार यांनी दिले,

या शिबिरास सेमी विभागाचे दिगंबर जगताप, पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, राजकुमार गवळी, रवीकिरण दंतकाळे, पूजा कडबगावकर, मल्लिनाथ जमखंडी, मनीषा दूधभाते आदी शिक्षक उपस्थित होते.

सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार निशिगंधा कोळी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages