कोल्हापूर (कटूसत्य वृत्त) : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांना खासदार शाहू महाराज यांनी दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आत्मचरित्र 'सिंहायन' भेट दिले. मराठा आरक्षण चळवळीसह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचा साक्षीदार असलेले हे पुस्तक सामाजिक लढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज प्रयत्नशील असून, त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर गॅझेटियरमधील मराठा-कुणबी नोंदी, मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबतचे विविध पुरावे तसेच आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान शाहू महाराज यांनी पुष्पगुच्छ देऊन मनोज जरांगे यांचे स्वागत केले. यावेळी जरांगे यांनीही शाहू महाराजांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
याच प्रसंगी शाहू महाराज यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव लिखित आत्मचरित्र 'सिंहायन' मनोज जरांगे यांना भेट दिले. पुस्तक स्वीकारताना जरांगे यांनी ही भेट जपून घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले आणि सोबतच्या सहकाऱ्याला त्याबाबत विशेष सूचना दिली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये ही भेट विशेष लक्षवेधी ठरली.कोल्हापूर (कटूसत्य वृत्त) : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांना खासदार शाहू महाराज यांनी दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आत्मचरित्र 'सिंहायन' भेट दिले. मराठा आरक्षण चळवळीसह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचा साक्षीदार असलेले हे पुस्तक सामाजिक लढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज प्रयत्नशील असून, त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर गॅझेटियरमधील मराठा-कुणबी नोंदी, मराठा आणि कुणबी एकच असल्याबाबतचे विविध पुरावे तसेच आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान शाहू महाराज यांनी पुष्पगुच्छ देऊन मनोज जरांगे यांचे स्वागत केले. यावेळी जरांगे यांनीही शाहू महाराजांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
याच प्रसंगी शाहू महाराज यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव लिखित आत्मचरित्र 'सिंहायन' मनोज जरांगे यांना भेट दिले. पुस्तक स्वीकारताना जरांगे यांनी ही भेट जपून घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले आणि सोबतच्या सहकाऱ्याला त्याबाबत विशेष सूचना दिली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये ही भेट विशेष लक्षवेधी ठरली.
No comments:
Post a Comment