टिकेकरवाडी यार्डचे आधुनिकीकरण पूर्ण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 13, 2026

टिकेकरवाडी यार्डचे आधुनिकीकरण पूर्ण

 टिकेकरवाडी यार्डचे आधुनिकीकरण पूर्ण


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने टिकेकरवाडी रेल्वे स्थानकाच्या यार्डमधील पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या कामामुळे स्थानकावरील सुरक्षितता, गाड्यांची हाताळणी क्षमता आणि परिचालन कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार असून भविष्यात वाढत्या प्रवासी व मालवाहतुकीचा ताण समर्थपणे पेलणे शक्य होणार आहे. या कामांतर्गत जुन्या पॅनल

इंटरलॉकिंग प्रणालीच्या जागी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे मानवी त्रुटीची शक्यता कमी होऊन रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता अधिक बळकट झाली आहे. तसेच लांब प्रवासी व मालगाड्या सहजपणे हाताळता याव्यात यासाठी स्थानकावरील कार्यरत मार्गांचा

सिग्नलिंग प्रणालीसह पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा विस्तार करण्यात आला आहे. यार्डच्या आराखड्यातही बदल करून गाड्यांचे आगमन व निर्गमन अधिक वेगाने होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.अतिरिक्त शंटिंग सिग्नल आणि अद्ययावत सिग्नलिंग प्रणालीमुळे  गाड्यांची हालचाल अधिक कार्यक्षमतेने नियंत्रित करता येणार आहे. आधुनिक स्विचेस आणि सुधारित ट्रॅक व्यवस्थेमुळे रेल्वे संचालन अधिक सुरळीत होऊन विलंबाची शक्यता कमी होणार आहे. मालवाहतुकीला चालना

देण्यासाठी बॅलस्ट व माल हाताळणीसाठी असलेल्या सायडिंगचा विस्तार करण्यात आला असून त्यामुळे औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रालाही फायदा होणार आहे. या श्रेणीसुधारणेच्या कामासाठी युनिमॅट ट्रॅक टॅम्पिंग मशीन, रेल क्रेन, हायड्रॉलिक ट्रॅक जॅक, रेल कटिंग व ड्रिलिंग मशिन्स, टॉवर वॅगन आदी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. नियोजित ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान परिचालन,

अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार तसेच विद्युत विभागातील एकूण ३६८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी समन्वयाने हे काम पूर्ण केले. या आधुनिकीकरणामुळे सोलापूर विभागातील रेल्वेसेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages