आ. अभिजित पाटील यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

आ. अभिजित पाटील यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 आ. अभिजित पाटील यांच्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


माढा (कटूसत्य वृत्त): माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अडचणी व मागण्या आमदारांसमोर मांडल्या.
जनता दरबारात पाणीपुरवठा, वीज, महसूल, रस्ते, शेती, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकासकामांशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक त्या सूचना दिल्या.
मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जनता दरबार हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
यावेळी मतदारसंघातील विविध गावांतील शेतकरी, युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages