मोहरमनिमित्त 21 ते 26 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

मोहरमनिमित्त 21 ते 26 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 मोहरमनिमित्त 21 ते 26 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन






 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहरम कमिटी सोलापूरच्या वतीने मोहरमनिमित्त 21 ते 26 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ची माहिती कमिटीचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         मोहरम सणानिमित्त 12 जून रोजी मोहरम कमिटी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन बारा इमाम चौक येथील मोहोळकर कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.
21 ते 26 जून या कालावधीत कमिटीच्या नेतृत्वाखाली पंजांच्या शानदार मिरवणुका काढण्यात येणार आहेत. याअंतर्गत 21 जून रोजी सायंकाळी सात वाजता साखर पेठ रंगा चौक येथून पीर बडे मुस्लिमची (प्रथम मानाचा पंजा) मिरवणूक काढण्यात येणार आहे. 
22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता दुर्वेश मस्जिद शनिवार पेठ येथून पीर छोटे अब्बासअली पंजाची मिरवणूक निघेल. 23 जून रोजी रात्री नऊ वाजता मराठा वस्ती येथून पीर इमाम कासिम पंजाची तसेच टिळक चौक परीट गल्ली येथून पीर इमामे कासिम पंजाची मिरवणूक काढण्यात येईल. याशिवाय शनिवार पेठ तालीम जिंदाशाह मदार मोहल्लाच्या वतीने पीर इमाम कासिम पंजाची व रात्री आठ वाजता बारा इमाम चौक अहमद अली शाह पटांगण येथून पीर शहीदे आझम पंजाची मिरवणूक निघेल. 
24 जून रोजी रात्री नऊ वाजता समाचार चौक येथून पीर छोटे मौलाली पंजाची, विजापूर वेस्ट डॉक्टर झाकीर हुसेन चौक येथून रात्री अकरा वाजता घोडेपीर पंजाची ताबूत निघेल. रात्री बारा वाजता कुंभार 20 भुसार गल्ली येथून पीर बडे मौलाली 'मुशकिल कुशा' पंजाची मिरवणूक  तसेच बाळी वेस येथून पीर बडे अकबर अली पंजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ पीर मौलाली व पीर अकबर अली यांची भेट होऊन तिन्ही पंजांची संयुक्त मिरवणूक काढण्यात येईल.
25 जून रोजी रात्री दहा वाजता बेगम पेठ मस्जिद लगत असलेल्या पीर हुसेन बाशा नाले हैदर इमामे हुसेन पंजाची मिरवणूक, रात्री बारा वाजता बेगम पेठ बडी बाणेकरी तालीम येथून पीर बडे इमाम हुसेनी पंजाची मिरवणूक तसेच रात्री साडेअकरा वाजता रविवार पेठ येथून पीर नालसाहेब पंजाची मिरवणूक  काढण्यात येणार आहे.
26 जून रोजी पहाटे चार वाजता शनिवार पेठ दुर्वेश मशीद येथून पीर इमाम हुसेन पंजाची मशालीसह मिरवणूक काढण्यात येणार आहे.  सकाळी सहा वाजता दादा पीर पंजाची मिरवणूक सपार बांधव परिवाराच्यावतीने काढण्यात येणार आहे. त्यानंतर इमामे कासिम पंजे जमखंडीवाल्यांची पंजाची मिरवणूक निघेल. सकाळी सात वाजता इमामी कासिम पंजे नालबंद यांच्या परिवाराच्या पंजाची मिरवणूक, त्यानंतर मंगळवेढा तालीम येथून इमामे हुसेन
 साहेबांच्या पवित्र 72 कुटुंब अहले हरम पंजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी दोन वाजता पानगल मस्जिद शनिवार पेठ येथून मानाचे पीर इमामे हुसेनची मिरवणूक तसेच अन्य ठिकाणी देखील मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी साडेचार वाजता बारा इमाम चौक, मोहोळकर कॉम्प्लेक्स येथे साडी, महाप्रसाद व शरबत वाटप करण्यात येणार आहे.
         या पत्रकार परिषदेला कमिटीचे सरचिटणीस हाजी शकील शब्बीर मौलवी, खजिनदार शाह इकबाल म. हनीफ दुर्वेश आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages