सिव्हिल हॉस्पिटल मधील खड्ड्याबाबत संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

सिव्हिल हॉस्पिटल मधील खड्ड्याबाबत संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

 सिव्हिल हॉस्पिटल मधील खड्ड्याबाबत संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन



                      


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसर मध्ये अंतर्गत रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत व नव्याने सी.सी रस्ते तयार करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रुग्णाला होणारे त्रास शासनाला कळावे व जाग यावी म्हणून लक्ष वेधण्यासाठी अनोखे प्रत्येकात्मक आंदोलन करण्यात आले .
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर, जिल्हा तसेच राज्यातील विविध भागांतून हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉब कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे.
रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात ने-आण करावी लागते.

मात्र, हॉस्पिटल परिसरातील सर्व रस्ते अत्यंत खराब झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना व प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड वेदना व त्रास सहन करावा लागत असून अतिशय गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेतून सिव्हिल मध्ये जलद गतीने आणताना सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे जर यामध्ये रुग्ण दगावल्यास सिविल प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे जिल्हा संघटक विशाल जिल्हा संघटक दिलीप भोसले साळुंखे शहर सचिव सतीश वावरे पंकज  बहादुले आसिफ हकीम सतीश रंगारेआदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages