अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका; ५५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका; ५५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका; ५५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
 पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : आंबे-रांजणी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन हायवा टिप्पर, दोन टेम्पो आणि ११ ब्रास चोरलेली वाळू असा एकूण ५५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित वाहन चालक व मालकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंबे ते रांजणी दरम्यानच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
आंबे-रांजणी रोड तसेच गोपाळपूर परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन हायवा टिप्पर, दोन टेम्पो आणि ११ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५५ लाख ६६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वाहन चालक व मालक पप्पू शिंदे, रामा पुजारी आणि दत्ता भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, रणदिवे, सहाय्यक फौजदार जनार्दन करे, पोलीस हवालदार दीपक भोसले, मंगेश रोकडे, साळुंखे, विजयकुमार आवटी, संजय गुटाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, आसिफ नदाफ, महेश गोडसे आणि रामभाऊ चाटे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages