पंढरीत शुक्रवारी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

पंढरीत शुक्रवारी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन

 पंढरीत शुक्रवारी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन




>> आ. रोहित पवार यांचा सहभाग
> राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) ची पंढरीत बैठक
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला योग्य हमीभाव तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व फ्रंटल सेल प्रमुख आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या १२ जूनपासून पंढरपूर येथील शिवाजी चौक येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी पक्षाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली. आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेचजनजागृती अभियान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रविवारी यासंदर्भातील निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.
बैठकीदरम्यान आ. रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून आंदोलनाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी आंदोलन अधिक प्रभावी व व्यापक करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर, डॉ. योगेश रणदिवे, माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा युवक उपाध्यक्ष धीरज डांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या निमित्ताने पक्षाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक वाडदेकर यांचा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages