पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार

 पर्यावरण संवर्धनासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार

फ्रटेली वाइन्स व मोहिते-पाटील परिवाराचा सामाजिक उपक्रम




अकलूज (कटूसत्य वृत्त) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रटेली वाइन्स प्रा. लि., झंजेवाडी (खुडूस) येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कंपनी परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

याचबरोबर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले.

कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, कांचनमालादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, फ्रटेली वाइन्सचे संचालक अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, संयुक्ता मोहिते-पाटील आणि रुद्रवीर मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच बाबासाहेब इंगळे, शिवराज निंबाळकर, प्लांट हेड (जनरल मॅनेजर) दत्तात्रय घुले, सीनियर मॅनेजर (ऑपरेशन) विनायक महाजन, सीनियर मॅनेजर (प्लांटेशन डिव्हिजन) संदीप मगर, सीनियर मॅनेजर (क्वालिटी) लहूकुमार डांगरे, मॅनेजर (एचआर) विनोद पाटील, सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफिसर साधू येळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages