तुकाराम मुंढेना साखर आयुक्त करा; वसंत साळुंखे यांची मागणी
दौंड (कटूसत्य वृत्त):- सामान्य शेतकऱ्यांशी गोड वागणारा कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्त पदी नियुक्ती करावी अशी मागणी जय शिवसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी केली आहे.
तुकाराम मुंढे सध्या राजाच्या अन्न व औषध प्रशासन ( FDA ) विभागाचे आयुक्त Commissioner म्हणून कार्यरत आहेत. पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी दुधात भेसळ, रासायनिक फळे आणि बनावट उत्पादनांविरोधात संपूर्ण राज्यभरात धडक कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्या आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या धडाकेबाज आणि पारदर्शक कारभारामुळे सध्या साखर कारखान्यांमधील अनियमितता आणि साखर सम्राटांनी सरकारचे बुडालेले हजारो कोटी रुपये वसूल होईल साखर कारखाने भ्रष्टाचार मुक्त होऊन साखर उद्योगाला व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील व साखर सम्राटांना चाप बसेल अशी मागणी जय शिवसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment