कुंभार समाजातील गुणवंतांना आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 12, 2026

कुंभार समाजातील गुणवंतांना आवाहन

 कुंभार समाजातील गुणवंतांना आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
 कुंभार समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्केहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व समाजातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार येणार आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम चालू असून आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे तरी शहर जिल्ह्यातील कुंभार समाजातील पालकांनी आपल्या पाल्याचे गुणपत्रिका व मोबाईल नंबर नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल निलम नगर येथील कार्यालयात पाठवावेत अथवा समक्ष द्यावे असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे. संपर्क -  विठ्ठल कुंभार(९४२३५२६०७१), चंद्रकुमार कुंभार (९३७००२०३९६)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages