जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोफत हेल्थ चेकअप आणि ट्री प्लांटेशन - बी. एम. जाधव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “असोशियन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर “आणि“ महाराष्ट्र स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेल्फेअर कार्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने“ मोफत हेल्थ चेकअप आणि ट्री प्लांटेशन” चे कार्यक्रम आज शुक्रवार 12 जून रोजी सकाळी नऊ वाजता आय पी एस अधिकारी व मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.पी.एच & डब्ल्यू. सी मुंबईचे अर्चना त्यागी मॅडम यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे अध्यक्ष बी. एम.जाधव यांनी सांगितले.
सदरहू कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे कमिशनर एम. राजकुमार तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, चीफ इंजिनियर आर. एम. गोसावी आणि सुपरिंटेंडिंग इंजिनियर पी. आर. जाधव, ऋत्विक जयकर (डीन- सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर) हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत आरोग्य शिबिर हे बांधकाम क्षेत्रातील कामगारांकरीता करीत असून ते अशोक चौक येथे असलेल्या पोलीस हेडक्वार्टर 308, रेसिडेंट कॉटर साईट, सिटी पोलीस पेट्रोल पंपाच्या शेजारी येथे सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत चालणार असून या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव संतोषकुमार बायस यांनी केले आहे.
*चौकट* -
“असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर सोलापूर “आणि” एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट “यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ट्री प्लांटेशन आणि सेफ्टी ओरिएंटेशन वर्कशॉप तसेच गुड हेल्थ स्टेशन कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्याकरिता खास मुंबईवरून मॅनेजिंग डायरेक्टर एम.एस.पी.एच & डब्ल्यू. सी वरळीच्या अर्चना त्यागी (आयपीएस) या उपस्थित राहणार आहेत.

No comments:
Post a Comment