अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन




हवेली  ( प्रविण शेंडगे ) : लोणी काळभोर येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणी काळभोर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण ट्रस्ट व अलायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी मोफत नेत्र चिकित्सा, चष्मे वाटप, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी (पुणे) येथील अनुभवी नेत्रतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ३५० हून अधिक गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदूची समस्या आढळलेल्या ६० रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
तसेच शिबिरात आलेल्या गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार जवळचे चष्मेही विनामूल्य देण्यात आले. मधुमेह व रक्तदाब तपासणी सुविधेचाही अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठाण ट्रस्टचे पदाधिकारी, अलायन्स क्लब ऑफ पुणेचे सदस्य, स्वयंसेवक तसेच वैद्यकीय पथक यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा लोकहितकारी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages