बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही व पाट्यांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही व पाट्यांचे वाटप

 बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही व पाट्यांचे वाटप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना पाट्यांचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ जवळपास २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक बटगिरी होते. संस्थेचे अध्यक्ष शंकर बटगिरी यांनी प्रास्ताविकातून फाऊंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी श्रीमद् वीरशैव कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नागेश टंकसाल, संस्थेचे माजी सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, नीलकंठेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शामला गवनी, सौ. रेश्मा बोगा, दैनिक कटूसत्त्यच्या सौ. शिल्पा अलमेलकर, तसेच श्रीनिवास बंदगी, नरसिंग म्हंता, रमेश म्हंताटी, शशिकांत नादरगी, समर्थ बुगडी, नितेश पोगुल, राहुल गड्डम, लक्ष्मीकांत आडकी, राजू माचर्ला, प्रसाद माचर्ला, कार्तिक चिकनी, राजू आवाल, अंबादास दंडगळ, नवल बटगिरी, समर्थ मुटकिरी, रमेश कनकी, नविन गंजी यांच्यासह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत वह्या व प्राथमिक विद्यार्थ्यांना पाट्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी बी. नारायणा फाऊंडेशनचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बटगिरी यांनी केले, तर  निखिल बटगिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages