प्रभाग क्रमांक 26 मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क रस्ते कामास सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 26 मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क दरम्यानचा रस्ता ड्रेनेज कामासाठी खोदण्यात आला होता. ड्रेनेजचे काम झाल्यानंतर सदरचा रस्ता आहे त्या स्थितीत करून देणे क्रमप्राप्त असताना देखील सदर ठेकेदार यांनी तो रस्ता व्यवस्थित डांबरीकरण करून दिला नव्हता. त्यामुळे सदर रस्त्यावरून जाणारे-येणारे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना चालणे मुश्किल झाले होते.रस्ता उखडल्यामुळे अनेक अपघात घडले होते तसेच धुळ उडत असल्यामुळे अनेकांना श्वास घेणे जिक्रीचे झाले होते. अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले होते. त्या भागातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व नव्याने निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांना सदर रस्त्याच्या समस्या बाबत वेळोवेळी तक्रार करूनही कोणीच दखल घेत नव्हते. शेवटी वैतागून सदर भागातील नागरिक यांनी नागरिकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून सदर समस्या सांगितल्यानंतर दिनांक 22 मे 26 रोजी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेता नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देण्यात आले होते याची दखल घेऊन सदर रस्ते कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे सदर रस्त्यावरून जाणारे-येणारे सर्वसामान्य नागरिक सुटकेचा निःश्वास सोडला असून सदर रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवल्याबद्दल मनापासून आभार मानले आहेत. व आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेवक असावा तर माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या सारखा असावा कारण त्यांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा नागरिकांचे कामे मनावर घेऊन करत आहेत असे मनोगत व्यक्त केले.
.png)
No comments:
Post a Comment