पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस बार्शी तालुका पोलिसांकडून अटक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस बार्शी तालुका पोलिसांकडून अटक

 पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस बार्शी तालुका पोलिसांकडून अटक


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील बाशी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेलजवळ पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यारही जप्त करण्यात आले आहे.
दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजण्याच्या सुमारास धनश्री ऋषीकेश पाटील या महिला बचत गटाचे काम करून लक्ष्याचीवाडी येथून बार्शीकडे ज्युपीटर दुचाकीवरून परत येत होत्या. यावेळी प्रविण हॉटेलजवळ आरोपी ऋषीकेश संभाजी पाटील (रा. नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी) याने त्यांना अडवून चारित्र्यावर संशय घेत धारदार हत्याराने गळा, मान व पोटावर वार केले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक महेश माने व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांच्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 151/2026 नुसार BNS कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चौकशीमध्ये आरोपीने गुन्ह्यातील हत्यार लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष फिंगरप्रिंट पथक, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ते हत्यार जप्त केले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages