चिमुकल्याच्या मदतीसाठी शिखर पहारिया फाउंडेशन धावले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

चिमुकल्याच्या मदतीसाठी शिखर पहारिया फाउंडेशन धावले

 चिमुकल्याच्या मदतीसाठी शिखर पहारिया फाउंडेशन धावले

 हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईकडे रवाना 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सैफुल परिसरातील बसवराज जवळगे यांच्या अवघ्या चार दिवसांच्या चिमुकल्या बाळाला हृदयाशी संबंधित गंभीर आजार असल्याचे निदान डॉक्टरांनी केले असून तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या नाजूक अवस्थेत बाळाला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
अत्यंत कठीण आणि चिंताजनक परिस्थितीत कुटुंबावर मोठा मानसिक व आर्थिक ताण निर्माण झाला असताना, माणुसकीचा हात पुढे करत शिखर दादा पहारिया यांनी मदतीचा आधार दिला आहे. या निरागस जीवाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तत्काळ सहकार्य करत कुटुंबाला दिलासा दिला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे शिखर दादा पहारिया हे अशा प्रसंगी अनेकांसाठी आधारवड ठरत आहेत. त्यांच्या या सहकार्यामुळे जवळगे कुटुंबाला मोठा धीर मिळाला असून, बाळाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, संबंधित डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुंबईत बाळावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येणार असून, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे.
मानवी मूल्ये जपणाऱ्या अशा संवेदनशील मदतीमुळे समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरत असून, संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
 या बाळाला लागणाऱ्या उपचाराची माहिती रुग्णसेवक आशम फुलमामडी यांनी दिल्यानंतर
शिखर पहारिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही  मदत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages