निमगावात शक्तिपीठ महामार्गाला समर्थन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 4, 2026

निमगावात शक्तिपीठ महामार्गाला समर्थन

 निमगावात शक्तिपीठ महामार्गाला समर्थन

जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला माळशिरस तालुक्यातील निमगाव ,वेळापूर, माळखांबी,गारवड सह इतर गावातून जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी समर्थन दिले असून हा शक्तिपीठ महामार्ग व्हावा परंतु शक्तिपीठ महामार्ग होत असताना आमच्या जमिनीचा दहापट मोबदला मिळावा अशी मागणी केली असून लवकरच याबाबतीत माळशिरस तालुक्यातील शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या संदर्भात निवेदन देणार असल्याचे सांगितले.

    शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीने निमगाव येथे रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेस निमगाव, वेळापूर, माळखांबी, गारवड आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शक्तीपीठ महामार्गाचे उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर दुसऱ्या बाजूला शक्तिपीठाच्या विरोधात रान उठवले जात असून स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची नुकतीच वेळापूर येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सभा झाली होती या अनुषंगाने निमगाव येथील पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

   या पत्रकार परिषदेस निमगाव व परिसरातील जवळपास 90% बाधित शेतकरी उपस्थित होते या सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास समर्थन दिले असून जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा असा आशावाद व्यक्त केला आहे जे शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे हेही सरकारने तपासावे असेही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती करण्यात आली या महामार्गामुळे दळणवळणाची साधने वाढून शेतीमालाला बाजार भाव मिळणार आहे या महामार्गाबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत सर्विस रोड, पाईपलाईन पासिंग, अंडरपास किंवा बोगदे याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड, पाचशे मीटर अंतरावर अंडरपास पलीकडच्या बाजूला राहणाऱ्या शेतजमिनीस पाईपलाईन नेता येणार आहे यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे स्वागतच आहे परंतु मोबदल्यासाठी सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चौकट 

           शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये इतर लोकांची संख्या जास्त आहे ज्यांचे क्षेत्र या महामार्गात जात आहे त्या  90 टक्के लोकांचा पाठिंबा आहे परंतु  विनाकारण विरोधाभास केला जात आहे विरोध करणाऱ्या लोकांना आमची विनंती आहे आमची काळजी करण्यापेक्षा भावी पिढीचा व आपल्या विकासाचा विचार करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा व तालुक्याच्या व गावच्या विकासाला हातभार लावा

  किरण पाटील, ग्रा पं सदस्य, निमगाव 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages