श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयास घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 4, 2026

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयास घवघवीत यश

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयास घवघवीत यश



पुणे (कटूसत्य वृत्त):- इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आंतरशालेय बक्षीस वितरण समारंभामध्ये श्री, सयाजीनाथ महाराज विद्यालयास घवघवीत यश प्राप्त झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ भारती उपाध्ये (वाईस प्रिन्सिपल बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे), डॉ. शांतनु गोखले (चेअरमन रेड क्रॉस सोसायटी) तसेच प्रा. आर वी. कुलकर्णी (सेक्रेटरी रेडक्रॉस सोसायटी) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

विद्यालयास समुहगीत स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागास प्रथम व प्राथमिक विभागास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला, पथनाट्य स्पर्धेमध्येमध्ये ज्युनिअर कॉलेज विभागास द्वीतीय क्रमांक व माध्य. विभागास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. वैयक्तिक स्पर्धामध्ये निबंध स्पर्धेमध्ये चि. सुजल सावंत यास द्वितीय व वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु. श्रावणी जोगदंड हिस द्वितीय क्रमांक व कु. श्रेया यमलवार हिस प्रथम क्रमांक प्राप्त झाला. पूर्व प्राथ. विभागामध्ये कु. अनन्या काकडे हीस निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कु. गौरी सत्वधर, कु ज्ञानेश्वरी सगळे व कु. तनुजा शिंदे यांनीउल्लेखनीय कामगिरी केली. विद्यालयातील शिक्षक डॉ. वाघ कल्याण, सौ भोई ज्योती, श्रीम. देवकर सोनाली, श्रीम. कुलकर्णी दाक्षायनी व मोहरीर रोहित यानी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन अध्यक्ष आ. रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, संजय मोझे व मा, प्राचार्य राजकुमार गायकवाड सर प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सुधीर शिंगटे यांनी केले व पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती भारती कांबळे यांनी केले.  
अशी माहिती श्री सयाजीनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages