मोहोळला चार कोटींची भेट; सांस्कृतिक सभागृहाला मंजुरी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील बहुप्रतीक्षित सांस्कृतिक सभागृह उभारणीच्या मागणीला अखेर यश आले असून शासनाकडून या प्रकल्पासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीमुळे शहरातील कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सांस्कृतिक सभागृहासाठी मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
मोहोळ शहरात सांस्कृतिक सभागृह व्हावे यासाठी अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करणारे कलाकार प्रतिनिधी अमोल महामुनी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत मागणी लावून धरली होती. मात्र, त्या काळात संबंधित पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर आमदार राजू खरे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याने कलाकारांच्या दीर्घ प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे.
याप्रसंगी माजी सरपंच अशोक देशमुख, सिनेअभिनेते अमोल महामुनी, ग्रामपंचायत माजी सदस्य दिनेश घागरे, दिलीप गायकवाड, अॅड. विनोद कांबळे, सरफराज सय्यद तसेच कलाकार राजन घाडगे यांनी आमदार राजू खरे यांचा सत्कार केला.
यावेळी उपस्थितांनी हे सभागृह मोहोळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना आ.राजू खरे म्हणाले, "मोहोळच्या सांस्कृतिक चळवळीला सक्षम व्यासपीठ मिळावे हीच आमची भूमिका आहे. या सभागृहासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक उच्च प्रतीचे, दर्जेदार आणि देखणे सांस्कृतिक सभागृह मोहोळमध्ये उभारले जाईल."
.jpeg)
No comments:
Post a Comment