अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

 अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


करमाळा, (कटूसत्य वृत्त):- राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिवरवाडी येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता ग्रुप हिवरवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते १२ या वेळेत मेडिकेअर ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून एच. व्ही. देसाई नेत्र तपासणी केंद्र, करमाळा यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिरही पार पडणार आहे.
सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. “राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याकडून चालू पिढीने काय घ्यावे” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत स्नेह भोजनाचा कार्यक्रम होणार असून राहुल गोविंद पवार, गोदावरी अँग्रो यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ ते १० या वेळेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती उत्सवात शिवमुद्रा बॅंजो, एस.के पेपर ब्लास्ट व आकर्षक डेकोरेशन हे विशेष आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हिवरवाडी (ता. करमाळा) येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजमाता ग्रुप हिवरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages