विनोद रणदिवे यांचा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

विनोद रणदिवे यांचा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते सन्मान

 विनोद रणदिवे यांचा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते सन्मान



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरातील आंबेडकरी चळवळीचे युवा नेते विनोद रणदिवे यांची नुकतीच सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजप नेते बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते विनोद रणदिवे यांचा फेटा, शाल, हार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 यावेळी डॉ.एम.पी. मोरे, धैर्यशील देशमुख, अमरशील देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, धनाजीराव देशमुख, एस.एन.डी.स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, अँड. रणवीर देशमुख, करण देशमुख, उद्योजक अतुल बावकर,अँड. शिवाजीराव पिसाळ,अर्जुन जठार, महेश शेटे, नारायण बोराटे,जयदिप पवार, रोहित शेटे, शक्ती पलंगे, इमरान नदाफ, बादल सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेने व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राम सातपुते यांच्या शिफारशीने सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन यांनीअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत आणि केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी नातेपुते येथील विनोद रणदिवे यांची सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages