श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान व पद्मकमळ परिवार आयोजित!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजकाल प्रत्येक व्यक्ती दिवसातून एकदा, आठवड्यातून ४-५ दिवस किंवा महिन्यातून किमान १०-१२ वेळा सिझन फ्रूट्स (मौसमी फळे) खातात. त्याचबरोबर प्रवासात किंवा रस्त्यावर खातातच. सदरच्या फळांमधील बियां कच-यात टाकून देतात. असे न करता, महाराष्ट्र दिनांपासून, स्वच्छ व एकत्र जमा करुन येत्या दि. ७ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी दुपारी १ वाजेपर्यंत 'दाजी पेठ येथील पूर्व विभाग श्रीराम मंदिर देवस्थान' येथे आणून द्यावेत, अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संघम'च्या कार्याध्यक्षा सौ. सविता येदूर, वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र गाजूल आणि पद्मकमळ परिवाराचे संस्थापक गोपीकृष्णा वड्डेपल्ली यांनी दिले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम 'जून महिना ते अखेरपर्यंत' (फक्त एक महिना) दर रविवारी सकाळी ११ ते १ पर्यंत बियां स्वीकारण्यात येणार आहे. सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान आणि पद्मकमळ परिवार यांच्या वतीने आयोजन केले असून, 'सध्या वाढणारे तापमान भविष्यात धोकायदायक होऊ नये' म्हणून, जमा झालेल्या फळांच्या बियां पावसाळ्यात ओपन जागेत, रस्त्याच्या कडेला मातीत आणि आवश्यकता असेल रस्त्याच्या दुभाजकांमध्ये टाकणार आहोत. सुमारे दीड महिन्यात जेवढे जमा होतील तेवढे एका कागदात आणून द्यावेत, असे आवाहन फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, सदस्य श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली, सखी संघम'च्या सचिवा कु. रुचिरा मासम, मेघा इट्टम, ममता तलकोकूल, गीता भूदत्त, पल्लवी संगा, वनिता सुरम, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे. ही संकल्पना फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमात जास्तीत जास्त सोलापूरकरांनी सहभागी होऊन बियां जमा करावे यासाठी पद्मकमळ परिवाराचे रमेश कंदीकटला, जवाहर मंगलपल्ली, श्रीनिवास दुभास, आनंद दुडम, श्रद्धानंद गुंडला, दिगंबर कुरापाटी, कुमार उसाकोयल, लक्ष्मीदास भंडारी, अंबादास कट्टा, गोविंद बत्तुल यांनी केले आहे.
● चौकट ●
सोलापूरकरांनी, या उपक्रमाला साथ देण्यासाठी सकारात्मक आणि माणूसकी या नात्याने विचार केल्यास सोलापूर शहर हिरवळ होण्यास मदतच होईल. याचबरोबर प्रत्येकाने, स्वर्गवासी झालेल्या कुटूंब कर्त्यांचे नावे किमान एकतरी रोप लावून त्याचे संगोपन करावे. त्या रोपाचे 'नामकरण' केल्यास एकप्रकारे स्वतःलाच आनंद मिळेल. तसेच या अभिनव उपक्रमात परगावीच्या नागरिकांना सहभागी होण्याची आवड व इच्छा असलेल्यांनी 'सरगम टी कोल्ड्रींक्स, दत्तनगर, सूर्या जिम खाली' सोलापूर. ५. या पत्त्यावर बियां पाठवू शकतात, असेही गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment