धाराशिवच्या : ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

धाराशिवच्या : ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत

 धाराशिवच्या : ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत



कळंब (कटूसत्य वृत्त):-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले.
हे संमेलन दि. २९ व ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथील लोकनेते अजितदादा साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होणार असून देशभरातील सुमारे ९०० साहित्यिक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
डॉ. राऊत यांचे मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील ‘दौशाड’ हे आत्मकथन विशेष लोकप्रिय ठरले आहे. तसेच ‘कंजाळ’, ‘बिलिंगा’, ‘काडकुसुंबा’, ‘हराटी’ आदी ग्रंथांद्वारे त्यांनी समृद्ध लेखन केले असून विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
यापूर्वी या संमेलनाच्या अध्यक्षपदी नारायण सुर्वे, वसंत बापट, द. मा. मिराजदार, शिवाजी सावंत, फ. मु. शिंदे, केशव मेश्राम, सुरेश भट, रा. रं. बोराडे, रामनाथ चव्हाण, श्रीपाल सबनीस, विश्वास पाटील, गंगाधर पानतावणे, विठ्ठल वाघ, डॉ. जनार्दन वाघमारे, भास्कर चंदनशिवे, इंद्रजित भालेराव, प्रा. मिलिंद रंगारी, सुवर्णा पवार यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी पद भूषवले आहे.
डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, गोरक्षनाथ भांगे, राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, लीलादेवी पाटील, प्रदेश सरचिटणीस सुनील लोणकर, संतोष शेलार, प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर, उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष मीना महामुनी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages