अपघातादिवशी सिंग यांच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम?; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

अपघातादिवशी सिंग यांच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम?; रोहित पवारांचा गंभीर आरोप

 अपघातादिवशी सिंग यांच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम?; रोहित पवारांचा गंभीर आरोप



पुणे (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणात नवीन वाद निर्माण झाला असून, अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतर मोठ्या आर्थिक व्यवहारांचे आरोप पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या दिवशी विमान कंपनीशी संबंधित पालक व्ही. के. सिंग यांच्या खात्यात तब्बल ९ कोटी ८१ रुपये हस्तांतरित करण्यात आले. तसेच, अंत्यविधीच्या दिवशी त्यांच्या खात्यात आणखी १६ कोटी ८८ लाख रुपये जमा झाल्याचा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत संबंधित विमान कंपनीच्या खात्यात एकूण ४५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या अपघाताच्या तपासाबाबत सरकार आणि तपास यंत्रणा गांभीर्याने काम करत नसल्याची नाराजी रोहित पवार यांनी व्यक्त केली. तपासाचा आढावा घेण्यासाठी ते सीआयडी कार्यालयात गेले असता, वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळले. सलग तिसऱ्यांदा भेट देऊनही जबाबदार अधिकारी न भेटल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“अजित पवार विमान अपघात प्रकरणाकडे सरकार आणि तपास यंत्रणा गंभीरतेने पाहत नाहीत. पुढील वेळी मला सीआयडी कार्यालयाबाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांशीच संवाद साधावा लागेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याचबरोबर, अपघातापूर्वी काटेवाडीतील निवासस्थान आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याच्या परिसरात अघोरी पूजा झाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. “आम्ही काळी जादू किंवा भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, मात्र या घटनांमागील उद्देश काय आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. हा प्रकार एखाद्या राजकीय षड्यंत्राचा भाग असू शकतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

अघोरी पूजा प्रकरणासह अशोक खरात प्रकरणाचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.दरम्यान, या सर्व आरोपांमुळे अजित पवार विमान अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, तपास यंत्रणांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages