हंगामी माजी राष्ट्रपती ब्रह्मदेव पासवान यांची जिजाऊ ज्ञान मंदिरात सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

हंगामी माजी राष्ट्रपती ब्रह्मदेव पासवान यांची जिजाऊ ज्ञान मंदिरात सदिच्छा भेट

 हंगामी माजी राष्ट्रपती ब्रह्मदेव पासवान यांची जिजाऊ ज्ञान मंदिरात सदिच्छा भेट




कोंडी (कटूसत्य वृत्त):- भूतपूर्व हंगामी राष्ट्रपती तथा राज्यसभेचे माजी खासदार ब्रह्मदेव पासवान आणि समाजसेवक बी एन पटेल कुमार यांनी जाणता राजा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलास सदिच्छा भेट दिली.
प्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
त्यानंतर प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष शिवश्री गणेश निळ यांनी केले. 
याच कार्यक्रमाच्या दरम्यान पुढील वर्षी सुरु होणाऱ्या जिजाऊ गुरुकुल पत्रक प्रकाशन माजी राष्ट्रपती ब्रह्मदेव पासवान आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारताचे हंगामी राष्ट्रपती ब्रह्मदेव पासवान यांच्या हस्ते जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थ्यां डॉक्टर श्री लक्ष्मण केत याने एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यामुळे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला

यावेळी बोलताना राज्यसभेचे माजी खासदार ब्रह्मदेव पासवान यांनी भारत देशाची अमेरिकेमध्ये जाऊन कशाप्रकारे मान उंचावली हे आपल्या उगवत्या शैलीमध्ये सांगितले. 

भारत देशा मध्ये फार मोठी शक्ती आणि ताकद असून डोळे आणि कान ईश्वराने प्रत्येकाला दिल्यामुळेच आपण फार मोठी प्रगती करू शकतो असे यावेळी शेवटी बोलताना पासवान यांनी सांगितले. 
याच कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपाचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
भटक्या विमुक्त जाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिभीषण जाधव यांनीही आपले विचार प्रकर्षाने मांडले. 

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक बिर्याणी पटेल कुमार, महिला विमुक्त जाती महासंघाच्या अध्यक्षा पुनम बिडकर, राजेश बिडकर ,महेश जाधव, आधी सह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages