लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरू

 लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरू

राजकारण करत असताना नेत्याप्रति असलेली सामाजिक बांधिलकी जपली- सौरभ थिटे


पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्व.अजितदादा पवार यांच्या तृतीय मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावतीने पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील विसावा मंदिर येथे मोफत वाचनालय सुरू करण्यात आले असून याप्रसंगी अजितदादांच्या फोटोस पुष्पहार घालून वाचलनायाचे उद्‌घाटन माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्याहस्ते नगरसेवक बालाजी मलपे, नगरसेवक सौरभ थिटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पंढरपूर शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
  अजितदादांच्या आठवणींना उजाळा देवून दादांबद्दल आपले विचार व्यक्त केले व कोणतेही पद असो अथवा नसो राष्ट्रवादीच्या बॅनरखाली श्रीकांत शिंदे हे नेहमीच अजितदादांच्या विचारांवर चालणारा कट्टर कार्यकर्ता असून खऱ्या अर्थाने स्व अजितदादा पवार यांच्या समरणार्थ गेली तीन महिने झाले दादांना जाऊन पन प्रत्येक सामाजिक उपक्रम राबवून श्रद्धांजली अर्पण करत आहे. राजकारण करत असताना नेत्याप्रति असलेली सामाजिक बांधिलकी जपली....असे प्रतिपादन पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक सौरभ थिटे यांनी केले.
या कार्यक्रमावेळी गणेश अधटराव यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी गणेश आधटराव, नगरसेवक बालाजी मपले, नगरसेवक सौरभ थिटे मुहम्मद उस्ताद, शहराध्यक्ष,दिगंबर सूडके, संजय म्हमाने, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे, श्रीयेश अभंगराव,विकी अभंगराव,जेष्ठ नागरिक शरद परचंडे,बाप्पुसाहेब चव्हाण, नामदेव चव्हाण,अनिल झुंजार,भिमराव जाधव,नागेश सूर्यवंशी, काळे साहेब आदी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages