आंबेडकर जयंती निमित्त बार्शीत संविधान वाचन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

आंबेडकर जयंती निमित्त बार्शीत संविधान वाचन

 आंबेडकर जयंती निमित्त बार्शीत संविधान वाचन




बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्रीमंत शिवसुर्य बहुद्देशीय प्रतिष्ठान बार्शी, संचलित शिवसेवा वाचन संस्कृती बार्शी तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संविधान वाचन करून या महामानवाना आदरांजली वाहण्यात आली.श्री कृष्ण मंदीर उपळाई रोड येथे याचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सई वुमन्स हाॕस्पीटलचे डॉ. कुमार जगताप तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अॕड.विवेक गजशिव , सामाजिक कार्यकर्ते सुमित खुरंगळे , पत्रकार चंद्रकांत करडे,गणेश भोळे ,उत्तम पोतदार ,शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील, नगरसेवक आकाश राऊत ,रणजीत पाटील, सूर्या मस्के, जाणीव  फाउंडेशनचे उपाध्यक्ष वसंत मामा हवालदार , ग्रंथपाल विनोद गायकवाड हे उपस्थित होते. सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अतुल पाडेसर यांनी केले. या नंतर समीक्षा जमदाडे हिने संविधान वाचन  केले .यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना महापुरुषांचे पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शनाचे काम उदयकुमार पोतदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितम मोरे,गणेश पवार, राज सदावर्त,राज जगताप, वेदांग पाडे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages