अकलूज येथे मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे मोठ्या उत्साहात, विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी, सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे, बुद्ध वंदना घेण्यात आली,यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील,नगराध्यक्ष रेश्माताई आडगळे, क्रांतिसिंह माने पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्ध वंदना होताच,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गेले दोन तीन महिन्यांपासून अकलूज परिसरातील, मंडळांकडून भीम जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता, समस्त बंधू भगिनींनी व लहान थोरानी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपस्थित राहून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.यावेळी तमाम बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
गेले दोन तीन दिवस अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, अकलूज परिसरात,विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
14 एप्रिल रोजी सायंकाळी सर्व नियमांचे पालन करून, अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणुकीत 14 रथ सहभागी झाले होते. प्रत्येक मंडळानी रथा मार्फत सामाजिक संदेश देत, जयंती साजरी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बसस्थानक येथून, सदुभाऊ चौक ते गांधी चौक,जुनी पोलिस चौकी पासून ,पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment