श्री क्षेत्र मार्डी येथे भाविकांसाठी पाणपोईचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2026

श्री क्षेत्र मार्डी येथे भाविकांसाठी पाणपोईचा शुभारंभ

 श्री क्षेत्र मार्डी येथे भाविकांसाठी पाणपोईचा शुभारंभ




उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र मार्डी येथील यमाई देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची तहान भागवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते  संजय खरटमल यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सोलापूर येथील पाखर संकुलाच्या संस्थापिका तथा शुभराय महाराजांच्या विद्यमान वंशज शुभांगी बुवा यांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री तात्याश्री विष्णू जगताप यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मार्डी गावचे उपसरपंच श्रीकांतजी मार्तंडे, शिवसेनेचे नेते संजयजी पौळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.

यमाई देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक मार्डी परिसरात येतात. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, संजय खरटमल यांनी सामाजिक बांधिलकीतून ही पाणपोई सुरू केली आहे. "यात्रेनिमित्त येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे हाच यामागचा उद्देश आहे," असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी सुवर्णाताई झाडे,शशिकांतजी मार्तंडे,प्रशांत काशीद,दत्ता गरड,मेजर लक्ष्मण राठोड,पोपट साठे,भिमा नारायणकर, प्रभाकर नवगेरे, शिवाजी इंगळे, पोपट साठे, अभिषेक नारायणकर, श्रीकांत मार्तंडे, बाणेगावचे उपसरपंच कांबळे, प्रभाकर कोळी, अचुत्य महाराज गिरी, रामहरी शेंडगे महाराज, राम ढगे, रमेश पाटोळे, दत्ता गायकवाड, चंद्रकांत नारायणकर, मोतीलाल नारायणकर, अन्नू मार्तंडे, ऍड अजित पाटील, भगवान कदम, प्रशांत काशीद आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाला मार्डी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय खरटमल यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages