सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूर चा दहावी चा १०० टक्के निकाल
कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी सी.बी.एस.ई द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परिक्षेचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली. यामध्ये प्रथम क्रमांक अथर्व कदम 98.8 टक्के, द्वितीय क्रमांक इशा शिनगारे 98.6 टक्के, तृतीय क्रमांक ईशान डिंगरे 98.2 टक्के गुण मिळवून यश मिळवले. इंग्रजीमध्ये सांची वोरा 100 गुण, हिंदी मध्ये 99 गुण अथर्व कदम व सिद्धराज कुसुमडे, मराठीमध्ये 100 गुण श्रद्धा खपाले, आर्या गुंड, प्रणित कलाशेत व शिवम गिड्डे, गणितामध्ये 95 गुण अथर्व कदम, सिद्धराज कुसुमोडे, विराज खरात व श्रद्धा खपाले, विज्ञान मध्ये 99 गुण दिविज व्यवहारे, सोशल सायन्स मध्ये 99 गुण अथर्व कदम व वैष्णवी इंगोले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये 100 गुण इशा शिनगारे, ईशान डिंगरे, भक्ती मुळे, आयुष नस्टे, दिविज व्यवहारे यांनी विषय निहाय प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच शाळेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले 68 विद्यार्थी , 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 71 विद्यार्थी व 70 ते 80 टक्के गुण मिळवलेले 35 विद्यार्थी आहेत.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. आशा बोकील, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कँम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



No comments:
Post a Comment