कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

 कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे पत्र सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.
तब्बल पावणेतीन वर्ष सोलापूरचे कामकाज पाहताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात सेवा बजावली आहेत. आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर आयटी पार्क साठी ही त्यांनी झोकून देऊन काम केले. यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे.
कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages