अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा- पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 10, 2026

अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा- पवार

 अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा- पवार


शिखर पहारिया फाउंडेशनने फुलविले हजारो चेहऱ्यावर हास्य

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध १४ महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला. उपस्थित हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. "अनंत" आनंदाचा शिधाने  ५ हजार घरांची चूल उजळणार आहे.१४ ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाला मोठे बळ दिले.
        प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपसह शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणच्या विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साही वातावरणात पार पडला.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे,
फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर , धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष कुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला. त्यानंतर महाउपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
       यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहारीया फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस महा उपक्रमाने साजरा केला. "अनंत" माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा या महाउपक्रमाने दिली आहे.आपण वाढदिवस साजरा करत नाही, तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत. अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा ‘अनंत’ प्रवास सुरू आहे.५ हजार कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे, तर आशेचा दिवा लावणे आहे असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
          दिवसभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड देण्यात येत असून, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूर या संस्थेत १० डबल बेड, राठोड अनाथ आश्रमात ५ बेड, मोहोळ आश्रम शाळेत १५ बेड देण्यात आले. येथील श्री गेनसिद्ध मंदिर येथे ८ लाख रुपयांचे  ५८.५ केव्हीए जनरेटर देण्यात आले. राणी लक्ष्मीबाई मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीग्रह मांजरेवाडी येथे आरओ प्लांट वॉटर मशीन भेट देण्यात आली. बोंबड्याला शाळेत डिजिटल ब्लॅक बोर्ड दिले. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर मारून सबमर्सिबल पंप सेट बसवून पाण्याची टाकी उपलब्ध केली.२०० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत केली.
        शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात आले असून, १० शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे.शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, संगणक संच आणि आरओ प्लांट बसवून आधुनिक शिक्षणाची दारे उघडली जात आहेत.याशिवाय सोलापुरात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येत असून, त्याठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर  महाउपक्रम राबवून सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव साजरा करण्यात आला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले. तन्वीर शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर राज सलगर यांनी आभार मानले.

जिल्हा रुग्णालयात ३८ लाखांचे वैद्यकीय साहित्य

नवनिर्मित सोलापूर जिल्हा रुग्णालयात 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य प्रदान करण्यात आले. या रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचकित्सक  डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन वायचळ, मेट्रन विजयमाला बेले यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वैद्यकीय साहित्य सामग्रीमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे.


शिखर पहारीया फाउंडेशनने समाजसेवेचा मानदंड निर्माण केला :  वीणा पवार


शिखर पहारिया फाउंडेशनने अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे. समाजसेवेचा मानदंड फाउंडेशनने निर्माण केला आहे. अशा उपक्रमांतून समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम होतो. इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा हा महोत्सव ठरला आहे.
हा उपक्रम प्रत्येकाच्या मनात सेवाभावाची ज्योत पेटवणारा आणि समाजाला दिशा देणारा आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या.

शिखर पहारीया फाउंडेशनच्या या परिवाराने घेतले परिश्रम

महा उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध केली होती. हा समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी  फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज खंदारे, धीरज कारंडे , इब्रान शेख, महताब शेख, पवन इगवे, राहुल तलवर, हरीश जाधव, प्रकाश बगलोलू ,अजय भंडारे, कृष्ण भंडारे, गणेश आमटेपागुल, ओंकार नवले, राजेश शिंगे, संजय भरड
यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चौकट-
वाढदिवसानिमित्त उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये अशी

 - सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम
 - ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ
 - शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर
 - हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती
-  ३०० विद्यार्थी दत्तक , १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली वाटप
- १०० मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना दिलासा
- २०० महिलांना शिलाई मशीन

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages