केळी निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारची कार्यवाही
खा मोहिते पाटील यांच्या मागणीला केंद्र सरकारचे उत्तर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना १७ मार्च २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रात इराण-इस्त्रायल संघर्ष मुळे Strait of Hormuz (होर्मुज सामुद्रधुनी) मार्गे सागरी वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा भारतातील महाराष्ट्रातील केळी निर्यातदारांना मोठा फटका बसत असल्याचे नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी खासदारांच्या पत्राची दखल घेतली असून, संबंधित विषय मार्गे लावण्या संदर्भात कार्यवाही करण्यात आल्याचे पत्राद्वारे माहिती कळवली आहे.
सदर परिस्थितीमुळे जेएनपीटी मुंद्रा पोर्ट येथे मोठ्या प्रमाणावर केळीचे कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे निर्यातदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.खासदार मोहिते पाटील यांनी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढून निर्यातदारांना दिलासा देण्याची मागणी केली होती. यावर केंद्र सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे दिसून येत असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment