मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण ओळखा व सुजाणं पालक बना- इंद्रजित देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण ओळखा व सुजाणं पालक बना- इंद्रजित देशमुख

 मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण ओळखा व सुजाणं पालक बना- इंद्रजित देशमुख 




अकलूज (कटूसत्य वृत्त):- पालकत्व ही केवळ एका घरापूरती मर्यादीत गोष्ट नसून ती संपूर्ण संस्कृतीचे प्रतिबिंब असतें. मुलांच्या अंगी असलेले चांगले उपजत गुण  ओळखा व सुजाणं पालक बना असा मौलिक सल्ला माजी सनदी अधिकारी व संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी दिला. 
अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या वतीने  शंकरनगर येथील स्मृती भवन मध्ये "पालकत्व आणि शिक्षकत्व एक सुसंवाद " या विषयावर इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपलें विचार मांडले.
देशमुख म्हणाले, 13 व्या वर्षापर्यंत मुलं हे निरागस असतें. या वयात पालकानी त्याच्या जवळ रहावे, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नये, त्याची इतरांशी तुलना करूं नये, त्याला रागावू नये, मारू नये व सततच्या सुचना करु नये. काही पालक घरात हुकूमशाही पद्धतीने वागतात त्यामुळे मुलांची कुचंबना होते. काही पालक भित्रे असतात तर काही रेसिंग पालक असतात. एकविसावे शतक हे शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घेउन आलेले शतक आहे. पालकानी काळाची पाऊले ओळखून रूढी, परंपरा यांना फाटा देऊन सुजाणं पालक बनण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या आवडी निवडी ओळखा, मुलांशी संवाद साधा आणि सर्वात महत्वाचे घरात आल्यावर मोबाईल बंद ठेवा असे ते म्हणाले. 
प्रारंभी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय रहावा म्हणून दरवर्षी व्याख्यांनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. मुलांच्या गुणांत्मक वाढी बरोबर त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्याचे काम संस्था करीत असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रातील बदल ओळखून संस्थेने मिलिनिअम स्कुलची स्थापना केल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव धर्माराज दगडे, डॉ विश्वनाथ आवड, अनिल जाधव, नितीन बनकर, रामकृष्ण काटकर प्राचार्य अल्बर्ट थरकन, प्रीन्सीपल बिनो के. पाऊलस, ह भ प सुरेश सूळ, प्रा धनंजय देशमुख यांच्यासह पालक व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार रोहित देशमुख यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages