आपल्यातलाच गद्दार निघाला म्हणत, माऊली पवारच्या प्रतिमेला मारले मराठा क्रांती मोर्चाने जोडे
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या १५ मराठा नगरसेवकांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी आयोजित केल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील चार पुतळा येथे दुपारी एक वाजता माऊली पवार हे आपल्यातीलच गद्दार आहेत असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने माऊली पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सागर शितोळे, गणेश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केला आहे, त्यांच्या हस्ते सत्कार ठेवून
मराठा समाजाला पालकमंत्री गोरे यांच्या दावणीला बांधण्याचे काम माऊली पवार करत आहे. आम्ही केलेली मागणी अंतिम टप्प्यात पूर्ण होत असताना माऊली पवार यांनी त्यावर पाणी सांडलं.
पालकमंत्री गोरे, आमदार राम जाधव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा तडवळकर यांच्यासोबत मिळून देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी पवार यांनी मराठा समाजाचे नुकसान केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या दीड महिन्यापासून वतीने सोलापूरचा महापौर मराठा समाजाचा करावा असलेल्या मराठा सदस्याला आणि ओबीसी सर्टिफिकेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करावे, यासाठी अनेक दिवसांपासून आहेत. यावेळी सोमनाथ राऊत वेगवेगळी आंदोलने केली जात यांनी माऊली पवार यांच्यावर टीका केली.
चौकट
स्वतःला सकल मराठा समाजाचा समन्वयक म्हणून घेणाऱ्या माऊली पवार यांनी मराठा समाजाच्या निवडून आलेल्या १५ नगरसेवकांचा सत्कार जर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते ठेवला असता तर आम्ही ते मान्य केलं असतं. मात्र ज्यांनी मराठा समाजाचे नुकसान केले त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार आयोजित करून माऊली पवार यांनी समाजाशी गद्दारी केली आहे
No comments:
Post a Comment