अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा झेंडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

 अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा झेंडा



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा रोवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या सभापतीपदी रश्मी सागर हिप्परगी तर उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी तथा निवडणूक पिठासीन अधिकारी सुमित शिंदे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शंकर कवितके यांनी करताच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला.

सभापती व उपसभापती पदासाच्या निवडीसाठी प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीची घोषणा होताच
उपस्थित सदस्य व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

याप्रसंगी नवनिर्वाचित सभापती रश्मी हिप्परगी यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षण, पाणीपुरवठा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांमध्ये ठोस कामे करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासाभिमुख प्रशासन राबविण्याची भूमिका स्पष्ट केली. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, योगीनाथ बाजारमठ, उपनगराध्यक्ष सुरेश नागोर, तुकप्पा नागोर, नगरसेवक महेश हिंडोळे, महेश इंगळे, अविनाश मडीखांबे, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, फैज अहमद कोरबु, लखन झंपले, मल्लिकार्जुन काटगाव तसेच भाजपचे पं.स. सदस्य सागर कल्याणशेट्टी, रश्मी हिप्परगी, अशा इंगळे, वैष्णवी सलगरे, विमल गव्हाणे, उत्तम वाघमारे, आप्पासाहेब किवडे, विनोद मोरे, तर शिंदे सेनेचे सदस्य शीतल म्हेत्रे, भीमणा सोलापूरे, गणेश मोरे, संगीता पाटील असे बारा सदस्य उपस्थित होते.

सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज विक्री करण्यात आले. १२ वाजे पर्यंत अर्ज दाखल करून घेतले. त्यानंतर माघार साठी वेळ देण्यात आला. दुपारी २ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केला. निवडी जाहीर होताच कार्येकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण केली. भाजपने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ पैकी ८ उमेदवारविजयी झाल्याने बहुमतात सत्ता स्थापन केली. विरोधी पक्ष शिंदेसेनेला चार जागा मिळाल्या आहेत.

चौकट 
• पंचायत समितीवर भाजपची सत्ता प्रस्थापित
• सभापती व उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध
• ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याची घोषणा
कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages