सोलापुरात पुन्हा पेटणार स्टोव्ह!
जिल्हा पुरवठा विभागाचा आपत्कालीन प्लॅन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आखाती देशांत सुरु असलेल्या युध्दांमुळे गॅस टंचाई प्रभावित झाल्याने आता रेशन कार्ड धारकांना केरोसिन वाटप करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहे.
सध्यस्थितीत करोसीन वाटप केल्यास त्यासाठी आवश्यक स्टोव्ह किती उपलब्ध आहे, केरोशीन कशी उपलब्ध करायची याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. याबाबत २३ मार्च रोजी प्रशासनाचा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. गॅस टंचाईमुळे अनेकांच्या घरात पुन्हा चुली पेटविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. शहरात इलेक्ट्रीक शेगडीला प्राधान्य दिले जात आहेत.
परंतू अनेक कुटुंबाना ते शक्य नसल्याने करोसिन वाटप करण्याचा हालचाली सुरु केल्याआहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून घरात स्टोव्ह आहे का, केरोसिन वापरण्यासाठी कोणती उपकरणे आहेत याबात पुरवठा विभागाने सर्वेक्षण सुरु केली आहे. प्राधान्य कुटुंबातील, तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकडून ही माहिती संकलित केली जात आहे. युध्दाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सर्व गॅस एजन्सींसमोर सध्या ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. व्यावसाविक गॅस पुरवठा बंद झाल्याने उद्योजकांची अडचण वाढली आहे. दुसरीकडे घरगुती गॅसचा वापर व्यावसायिकांकडून सुरू आहे. भविष्यात अशीच परिस्थितीत टंचाई उद्भवल्यास आपत्कालीन केरोसिनचा वापर करता येईल का, याचा शासनाकडून विचार सुरू आहे. केरोसिन वाटपाबाबत शासनाकडून अधिकृत पत्र आले नसून स्टोव्हचा सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले
प्राधान्य कुटुंबे, तसेच अंत्योदय योजनेत एकूण साडेचार लाख लाभार्थी आहेत. मात्र केरोशीन रेशन दुकानदारांमार्फत की केरोसिनवितरकांकडून पुरवठा करायचे याबाबत अजून निर्णय निश्चित झालेला नाही. तसेच करोसिन वाटप परवानाधकारचे नुतनीकरणही केले जाणार आहे. ज्यांची मुदत संपली आहे, त्यांच्याकडून पुन्हा मुदतवाढ देऊन केरोसिन वाटपाचे नियोजन सुरु आहे. ज्या भागांत केरोसिन वितरक नाही तेथे रेशन दुकानाच्यामाध्यमातून केरोसिन उपलब्ध करुन दिले जाण्याची माहिती संकलित केली जात आहे.

No comments:
Post a Comment